
Event Phone: +1 (781) 974-0011
- Marathi Shala 2023
August 1, 2022 - August 31, 2022
8:00 am - 5:00 pm
Registration closes Aug 31, 2023
मराठी शाळा (शार्लट)
नमस्कार,
शार्लट मराठी शाळा २०२१ मध्ये सुरू झाली. आपल्या शाळेचे विद्यार्थी बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या पहिल्या वर्गाच्या परीक्षेत उत्तम रितीने उत्तीर्ण झाले आहेत. आता शाळेच्या नवीन वर्षाची उत्साहात सुरवात होईल. या वर्षी पासून आपली मराठी शाळा नवीन ठिकाणी भरणार आहे. शार्लट आणि उपनगरीतील सर्वांना सोयीचं होईल असं ठिकाण शाळेसाठी निश्चित करण्यात आलं आहे.
मराठी शाळेची माहिती खालीलप्रमाणे -
* शालेय वर्ष सुरू होण्याची तारीख: September 03, 2023
* शालेय वर्ष संपण्याची तारीख: June 02, 2024
* शाळेची वेळ : दर रविवारी सकाळी १० ते १२
* शाळेचे ठिकाण : 5225 Seventyseven Center Dr. Charlotte NC 28217
* वयोगट: वय वर्ष ५ ते १५
* Mecklenburg county च्या शाळेचे वार्षिक वेळापत्रक मराठी शाळेसाठी वापरले जाईल.
* Mecklenburg county च्या शाळांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मराठी शाळाही बंद राहील. (उदा. Long weekends, Winter Break, spring break)
* गरज भासल्यास मराठी शाळा remote learning (झूम) तत्वावर चालवण्याचा निर्णय संपूर्णतः शार्लटमधील शाळा समितीचा असेल.
* मराठी शाळा नोंदणी शुल्क एका भागात भरल्यास : (वार्षिक शुल्क)
CMM सभासदांसाठी - $३००
CMM चे सभासद नसलेल्या व्यक्तींसाठी - $३७५
कृपया नोंद घ्या:
* मराठी शाळेची संपूर्ण फी शालेयवर्षाच्या सुरवातीला भरणं आवश्यक आहे. शाळेची फी पूर्ण शालेय वर्षाकरता आहे. शाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला की त्यानंतर फी परत देता येऊ शकणार नाही.
* मराठी शाळेची फी शार्लट मराठी मंडळाद्वारे स्वीकारली जाईल.
* शार्लट मराठी मंडळाच्या सभासदांच्या तर्फे ही शाळा चालवली जाईल. शार्लट मराठी मंडळ non profit (विनानफा तत्वावर चालणारी) संस्था आहे.
* मराठी शाळा समितीचे सदस्य या शाळेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतात. फीद्वारे जमा होणारी रक्कम शाळेसाठी लागणारी सामुग्री आणि शाळेच्या संदर्भातील खर्च यासाठी वापरली जाईल.
* विद्यार्थी नोंदणीनंतर शाळेसाठी आवश्यक गोष्टींची माहिती (information about allergies, photo / video consent form , शाळेत येताना काय आणावे इ.) पालकांना दिली जाईल.आवश्यकता वाटल्यास , शालेयवर्ष सुरू होण्याआधी पालकांच्या प्रश्नांची उत्तरं झूमद्वारे देण्यात येतील.
बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेच्या अधिक माहितीसाठी खालील दुवा वापरा.
https://bmmshala.net
धन्यवाद,
मराठी शाळा समिती
marathishala@charlottemarathimandal.org
Venue: Marathi Shala
Address: