भरीव सहभाग Supported Activities

आपल्या उत्साही मराठी मित्रांकडून विविध उपक्रम राबविले जातात… यातील सगळेच उपक्रम मंडळाशी संलग्न नाहीत. ते वैयक्तिक पातळीवर राबविली जातात त्यासाठी संपर्क संबंधित व्यक्तींना करावा.

:===========================================================================================

शिवस्य ढोल ताशा पथक

activities-shivasya

शिवस्य, जे शिवाचे आहे...  ढोल, ताशा, लेझीम, झांजा हे मराठी गणेशोत्सवाचे शेकडो वर्षापासून वैशिष्ठ्य राहिले आहे. आपणही लहानपणापासूनच ढोल ताशाच्या गजरामध्ये गणरायाचे आगमन, विसर्जन पाहिले, त्या सोहळ्याचा आनंद घेतला. तोच आनंद आपल्या पुढल्या पिढीला इथे परदेशात घेता यावा, आपल्या परंपरेची ओळख राहावी, आवड निर्माण व्हावी म्हणूनच शिवस्य ढोल ताशा पथक अस्तित्वात आले आहे.

ढोल / ताशा / लेझीम पथकाच्या माहितीसाठी संपर्क साधा: प्रमोद होलेदाजीबा पाटीलप्रताप पाटील

===================================================================================

अभिनय कट्टा

२००३ पासून शार्लटमध्ये नाटक सादर करायला सुरवात झाली. मंडळाच्या दिवाळीच्या कार्यक्रमात कधी स्कीट तर कधी व्यावसायिक मराठी नाटकाचं रुपांतर करून केलेलं सादरीकरण असं याचं स्वरूप होतं. नाटकाची आवड म्हणून सहज नाटक सादर करता करता नाटकाचा ग्रूप कधी तयार झाला ते कळलंच नाही. शार्लट मधल्या मित्रांनी नेहमीच आमच्या प्रयात्नांचं भरभरून कौतुक केलं. मग म्हणता म्हणता या ग्रूपला एक नाव घेऊया असं मनात आलं. त्यातूनच २०१४ मध्ये तयार झाला अभिनय कट्टा !

नाटक English भाषांतरासकट सादर करण्यात आलं. म्हणजे आमच्या नाटकाला ENGLISH SUBTITLES होती. नाटक चालू असताना, बाजूला असलेल्या स्क्रिनवर ENGLISH संवाद प्रोजेक्ट करून नाटक सादर करण्यात आलं.

ग्रुपची अधिक माहिती येथे वाचा. साक्षीदार या नाटकाचे फोटोज पाहण्यासाठी येथे क्लीक करा

तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर संपर्कासाठी: राहुल गरड- 704-941-7338

===================================================================================

Dragon बोट रेस

actvities-dragon-race

संपर्कासाठी निनाद सुळेसंगीता कोर्डे, महेश डोंगरे

===================================================================================

मराठी शाळा

Marathi-Shala

देश तसा वेष ही उक्ती भाषेबद्दलही स्वीकारत आपण आपली आणि मुलांची मुळं जाऊ तिथे रुजवतो. पण मातृभाषेची नाळ तूटून जाण्याआधी पक्की करायला हवी असं वाटून जाणारा क्षण आयुष्यात डोकावतोच. मग ती वेळ न येऊ देण्याची वेळीच का काळजी घेऊ नये? घरातील भाषा मराठी आणि व्यवहाराची इंग्रजी हे सहजसाध्य आहे. संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे की एकापेक्षा अधिक भाषा आल्या तर आकलनाची, अडचणी सोडवण्याची, संवाद साधण्याची, समजून घेण्याची क्षमता कितीतरी पटीने वाढते.

गेली दोन वर्ष मोहना आणि विरेन जोगळेकर यांच्या राहत्या घरी (south Charlotte, Ballantyne area)दर रविवारी मराठी मुलांचा किलबिलाट असतो. हसत खेळत शिका या तत्वाचा वापर करुन दोघं मुलांना मराठी शिकवतात. इथे मुलं शिकता शिकता स्वत:च गोष्टी तयार करतात, छोटे छोटे प्रवेश सादर करतात, खो, खो, कबड्डी सारखे खेळ खेळतात. सारं मराठी शिकत शिकत.

मराठी शाळेबद्दल अधिक माहिती साठी संपर्क:
मोहना जोगळेकर
इ मेल: mohana_joglekar@hotmail.com
वेबसाईट:  https://marathivarga.com/
फोन/whatsapp: +1-919-228-8104

===================================================================================

शार्लोट भटकंती

activities-bhatakanti

संपर्कासाठी वृषाली पटवर्धन

===================================================================================