मराठी शाळा (शार्लट)
marathishala

Event Phone: +1 (704) 706-7240

We're sorry, but all tickets sales have ended because the event is expired.
  • September 15, 2021 - June 30, 2022
    8:00 am - 5:00 pm

 







मराठी शाळा (शार्लट)
नमस्कार,

काही महिन्यांपूर्वी नमूद केल्याप्रमाणे शार्लट मराठी मंडळ आता शार्लटमध्ये बृहन् महाराष्ट्र मंडळाची मराठी शाळा चालू करीत आहे. त्यासाठी आवश्यक बाबींवर, मराठी शाळा समितीचे सदस्य गेले काही दिवस काम करीत होते.
या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल होण्यासाठी असलेली सर्वात महत्वाची आवश्यकता म्हणजे मराठी भाषा शिकण्याची इच्छा ! यात आम्हाला विद्यार्थ्याबरोबरच पालकांचाही सहभाग आवडेल बरं का ! त्याबद्दलची माहिती लवकरच देऊ.

मराठी शाळेची माहिती खालीलप्रमाणे -

* शालेय वर्ष सुरू होण्याची तारीख: सप्टेंबर २६ , २०२१
* शालेय वर्ष संपण्याची तारीख: जून २०२२
* शाळेची वेळ : दर रविवारी सकाळी १० ते १२
* शाळेचे ठिकाण : 10435 Kerns Rd, Huntersville, NC 28078, Shree Sai Gurudev Datta Mandir (Charlotte Shiridi Sai Mandir)
* वयोगट: वय वर्ष ५ ते १५
* Cabarrus county च्या शाळेचे वार्षिक वेळापत्रक मराठी शाळेसाठी वापरले जाईल.
* Cabarrus county च्या शाळांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मराठी शाळाही बंद राहील. (उदा. Long weekends, Winter Break, spring break)
* कोविडच्या काळात गरज भासल्यास मराठी शाळा remote learning (झूम) तत्वावर चालवण्याचा निर्णय संपूर्णतः शार्लटमधील शाळा समितीचा असेल.
* मराठी शाळा नोंदणी शुल्क एका भागात भरल्यास : (वार्षिक शुल्क)
CMM सभासदांसाठी -
$३००
CMM चे सभासद नसलेल्या व्यक्तींसाठी
$३५०
मराठी शाळा नोंदणी शुल्क दोन भागात भरल्यास : (वार्षिक शुल्क)
CMM सभासदांसाठी -
$१६५, उर्वरीत शुल्क $१६५
CMM चे सभासद नसलेल्या व्यक्तींसाठी
$१९०, उर्वरीत शुल्क $१९०
कृपया नोंद घ्या: मराठी शाळेची संपूर्ण फी शालेयवर्षाच्या सुरवातीला भरणं आवश्यक आहे. शाळेची फी पूर्ण शालेय वर्षाकरता आहे. शाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला की त्यानंतर फी परत देता येऊ शकणार नाही. मराठी शाळेची फी शार्लट मराठी मंडळाद्वारे स्वीकारली जाईल.
शार्लट मराठी मंडळाच्या सभासदांच्या तर्फे ही शाळा चालवली जाईल. शार्लट मराठी मंडळ non profit (विनानफा तत्वावर चालणारी) संस्था आहे. मराठी शाळा समितीचे सदस्य या शाळेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतात. फीद्वारे जमा होणारी रक्कम शाळेसाठी लागणारी सामुग्री आणि शाळेच्या संदर्भातील खर्च यासाठी वापरली जाईल.
विद्यार्थी नोंदणीनंतर शाळेसाठी आवश्यक गोष्टींची माहिती (information about allergies, photo / video consent form , शाळेत येताना काय आणावे इ.) पालकांना दिली जाईल.आवश्यकता वाटल्यास , शालेयवर्ष सुरू होण्याआधी पालकांच्या प्रश्नांची उत्तरं झूमद्वारे देण्यात येतील.

बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेच्या अधिक माहितीसाठी खालील दुवा वापरा.
https://bmmshala.net

धन्यवाद,
मराठी शाळा समिती
marathishala@charlottemarathimandal.org

Venue:  

Address:
Metrolina Regional Scholars' Academy, 5255 Seventyseven Center Dr, Charlotte, North Carolina, 28217, United States

Categories: Tags: