Details Price Qty
Shala Teacher's Children >> वार्षिक शुल्क (Yearly Fees) $200.00 USD  
CMM Member NEW $250.00 USD  
CMM Non Member NEW $300.00 USD  

Event Phone: Radhika Parmanand +1 (860) 899-6479 (WhatsApp

Registration closes 18th July 2026

मराठी शाळा (शार्लट)
नमस्कार,

]मराठी शाळेची माहिती खालीलप्रमाणे –

* शालेय वर्ष सुरू होण्याची तारीख:        August 23rd, 2026 (tentative)
* शालेय वर्ष संपण्याची तारीख:              June 7th, 2027 (tentative)
* शाळेची वेळ :                                  दर रविवारी सकाळी १० ते १२
* शाळेचे ठिकाण :                              Metrolina Regional Scholars’ Academy, 5225 Seventyseven Center Dr. Charlotte NC 28217
* वयोगट:                                          वय वर्ष ५ ते १५
* Mecklenburg county च्या शाळेचे वार्षिक वेळापत्रक मराठी शाळेसाठी वापरले जाईल.
* Mecklenburg county च्या शाळांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मराठी शाळाही बंद राहील. (उदा. Long weekends, Winter Break, spring break)
* गरज भासल्यास मराठी शाळा remote learning (झूम) तत्वावर चालवण्याचा निर्णय संपूर्णतः शार्लटमधील शाळा समितीचा असेल.

* मराठी शाळा नोंदणी : (वार्षिक शुल्क)

CMM सभासदांसाठी – $250, CMM चे सभासद नसलेल्या व्यक्तींसाठी – $300 व शाळेतील शिक्षकाच्या मुलांची $200 असेल. 

कृपया नोंद घ्या:

* मराठी शाळेची संपूर्ण फी शालेयवर्षाच्या सुरवातीला भरणं आवश्यक आहे. शाळेची फी पूर्ण शालेय वर्षाकरता आहे. शाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला की त्यानंतर फी परत देता येऊ शकणार नाही.
* मराठी शाळेची फी शार्लट मराठी मंडळाद्वारे स्वीकारली जाईल.
* शार्लट मराठी मंडळाच्या सभासदांच्या तर्फे ही शाळा चालवली जाईल. शार्लट मराठी मंडळ non profit (विनानफा तत्वावर चालणारी) संस्था आहे.
* मराठी शाळा समितीचे सदस्य या शाळेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतात. फीद्वारे जमा होणारी रक्कम शाळेसाठी लागणारी सामुग्री आणि शाळेच्या संदर्भातील खर्च यासाठी वापरली जाईल.
* विद्यार्थी नोंदणीनंतर शाळेसाठी आवश्यक गोष्टींची माहिती (information about allergies, photo / video consent form , शाळेत येताना काय आणावे इ.) पालकांना दिली जाईल.आवश्यकता वाटल्यास , शालेयवर्ष सुरू होण्याआधी पालकांच्या प्रश्नांची उत्तरं झूमद्वारे देण्यात येतील.

बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेच्या अधिक माहितीसाठी खालील दुवा वापरा.
https://bmmshala.net

धन्यवाद,
मराठी शाळा समिती
marathishala@charlottemarathimandal.org

राधिका परमानंद (प्राचार्य)

 

  • CMM मराठी शाळा नोंदणी 2026-27
     June 7, 2026 - July 18, 2026
     12:00 am - 11:45 pm CMM मराठी शाळा नोंदणी 2026-27

Venue:  

Address:
5255 Seventyseven Center Dr, Charlotte, North Carolina, 28217, United States

CMM WhatsApp Chatbot
CMM WhatsApp Chatbot