आपल्या उत्साही मराठी मित्रांकडून विविध उपक्रम राबविले जातात… यातील सगळेच उपक्रम मंडळाशी संलग्न नाहीत. ते वैयक्तिक पातळीवर राबविली जातात त्यासाठी संपर्क संबंधित व्यक्तींना करावा.
======================================================================================
शिवस्य, जे शिवाचे आहे… ढोल, ताशा, लेझीम, झांजा हे मराठी गणेशोत्सवाचे शेकडो वर्षापासून वैशिष्ठ्य राहिले आहे. आपणही लहानपणापासूनच ढोल ताशाच्या गजरामध्ये गणरायाचे आगमन, विसर्जन पाहिले, त्या सोहळ्याचा आनंद घेतला. तोच आनंद आपल्या पुढल्या पिढीला इथे परदेशात घेता यावा, आपल्या परंपरेची ओळख राहावी, आवड निर्माण व्हावी म्हणूनच शिवस्य ढोल ताशा पथक अस्तित्वात आले आहे.
ढोल / ताशा / लेझीम पथकाच्या माहितीसाठी संपर्क साधा: प्रमोद होले, दाजीबा पाटील, प्रताप पाटील
===================================================================================
कलायात्री ( प्रज्ञा आपटे )
मराठी माणसांच्या नाट्यप्रेमाला तोड नाही ! कारण महाराष्टाची नाट्यपरंपराच इतकी उत्तंग आहे की मराठी माणूस आणि नाट्यप्रेम यांचं एक अतूट नातं आहे. मग अमेरिकेत स्थायिक झालं तरी हे नाट्यप्रेम सुटू शकत माही.
त्यातूनच २००३ साली शार्लटमधे सुरू झाला एक नाट्यप्रवास. याची नांदी झाली प्रज्ञा आपटे निर्मित आणि दिग्दर्शित नाट्यप्रयोगाने. “ मोरुची मावशी “ या शार्लट मराठी मंडळाच्या दिवाळीमधे सादर झालेल्या नाटकाचं शार्लटकरांनी भरभरून स्वागत केलं. शार्लटमधले अनेक वर्षांपासूनचे रहिवासी रणजित आणि गीता गुर्जर यांचा यात सक्रीय सहभाग होता.
मराठी मंडळाच्या कार्यक्रमात नाट्यप्रयोग सादर करता करता अनेक नाटकवेड्या मित्रमंडळींची साथ मिळत गेली आणि मग मराठी मंडळाच्या दिवाळीसाठी “ शांतेचं कार्ट चालू आहे “ हे संपूर्ण नाटक २००८ मधे सादर केलं, ज्याला देखिल भरभरून प्रतिसाद मिळाला. आता दिशा नक्की ठरली आणि नाटकवेड्या मित्रमंडळींच्या साथीने, नाट्यप्रेमी शार्लटकरांसाठी कायम स्वरूपात नाटक सादर करण्यासाठी प्रज्ञा आपटे यांनी कलायात्री या नॉन प्रॉफिट संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत, सलग काही वर्ष, शार्लट मराठी मंडळाच्या संक्रांतीच्या कार्यक्रमात, प्रज्ञा आपटे निर्मित आणि दिग्दर्शित नाटकं सादर करण्यात आली. उदाहरणादाखल- लपंडाव, साक्षीदार, शू ऽऽऽ कुठे बोलायचं नाही, द रींग अगेन इत्यादी. या नाटकांचं सादरीकरण पहायला, प्रेक्षागृहात मातृभाषा मराठी नसलेले प्रेक्षकही असत. त्यांच्यासाठी English super titles देखिल होती. आपलं नाटक फक्त मराठी प्रेक्षकांपुरतं मर्यादित न ठेवता ते इतरांपर्यंत पोचवणं हे या मागचं उद्देश्य होतं.
गेले काही वर्ष कलायात्री ( FB Page : @wekalayatree) ही संस्था निधी संकलनासाठी ( fundraisers ) नाट्यप्रयोग सादर करते. प्रज्ञा आपटे यांना यात “ नाटक ज्यांचा धर्म आहे आणि रंगभूमीवर ज्यांचं प्रेम आहे “ अशा मित्रांची, कायमच भक्कम साथ मिळत आलेली आहे. आपल्या नाट्यप्रेमाचा, समाजोपयोगी गोष्टींसाठी वापर करताना प्रज्ञा आपटे यांना शार्लटमधील सुजाण प्रेक्षकांकडूनही कायमच उत्तम प्रतिसाद मिळत आलेला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत शार्लट मराठी मंडळातर्फे प्रज्ञा आपटे यांना शार्लट भूषण हा पुरस्कार २०२२ मधे देण्यात आला.
===================================================================================
संपर्कासाठी निनाद सुळे, संगीता कोर्डे, महेश डोंगरे
===================================================================================
मराठी शाळा
देश तसा वेष ही उक्ती भाषेबद्दलही स्वीकारत आपण आपली आणि मुलांची मुळं जाऊ तिथे रुजवतो. पण मातृभाषेची नाळ तूटून जाण्याआधी पक्की करायला हवी असं वाटून जाणारा क्षण आयुष्यात डोकावतोच. मग ती वेळ न येऊ देण्याची वेळीच का काळजी घेऊ नये? घरातील भाषा मराठी आणि व्यवहाराची इंग्रजी हे सहजसाध्य आहे. संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे की एकापेक्षा अधिक भाषा आल्या तर आकलनाची, अडचणी सोडवण्याची, संवाद साधण्याची, समजून घेण्याची क्षमता कितीतरी पटीने वाढते.
गेली दोन वर्ष मोहना आणि विरेन जोगळेकर यांच्या राहत्या घरी (south Charlotte, Ballantyne area)दर रविवारी मराठी मुलांचा किलबिलाट असतो. हसत खेळत शिका या तत्वाचा वापर करुन दोघं मुलांना मराठी शिकवतात. इथे मुलं शिकता शिकता स्वत:च गोष्टी तयार करतात, छोटे छोटे प्रवेश सादर करतात, खो, खो, कबड्डी सारखे खेळ खेळतात. सारं मराठी शिकत शिकत.
मराठी शाळेबद्दल अधिक माहिती साठी संपर्क:
मोहना जोगळेकर
इ मेल: mohana_joglekar@hotmail.com
वेबसाईट: https://marathivarga.com/
फोन/whatsapp: +1-919-228-8104
===================================================================================
संपर्कासाठी वृषाली पटवर्धन
===================================================================================