Charlotte Marathi Mandal
मराठी शाळा (शार्लट)
नमस्कार,
२०२१ साली साई मंदिरात सुरू झालेल्या मराठी शाळेला आता नेटकं स्वरूप आलं आहे. बृहन् महाराष्ट्र मंडळातर्फे आखून दिलेल्या अभ्यासानुसार ही शाळा शार्लट मराठी मंडळाच्या अंतर्गत चालवली जाते. शाळेची कार्यकारिणी समिती संपूर्णतः शाळेचं कामकाज पाहते. यात प्रशासकीय अधिकारी ( administrators ) आणि शिक्षक यांचा समावेश आहे. हे सर्वजण स्वयंसेवी तत्वावर काम करतात.
भारती विद्यापीठ ( पुणे) या विद्यापीठातर्फे वार्षिक परीक्षा घेतल्या जातात. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठातर्फे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा दाखला ( certificate) मिळतो. २०२३ मधे शाळेच्या वीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली व सर्वजण उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
या वर्षी शार्लट मराठी शाळेची विद्यार्थी संख्या बासष्ट आहे. मराठी शाळेत आपले वेगवेगळे सण, माहिती आणि हस्तकला अथवा शाळांतर्गत उपक्रमांद्वारे ( projects) साजरे करण्यात येतात. यात पालकांचाही मोठा सहभाग असतो. उपक्रमांच्या अंतर्गत मंडळाच्या दिवाळीसाठी कार्यक्रमाचे सादरीकरण तसेच शिवजयंती आणि मराठी भाषा गौरव दिन साजरे केले जातात. दिवाळीचा कार्यक्रम तसंच मराठी भाषा गौरव दिनाचे उपक्रम यांच्या चित्रफिती मराठी मंडळाच्या यू ट्युब वाहिनीवर उपलब्ध आहेत.
मराठी शाळेचे स्वतःचे एक वेळापत्रक आहे. त्याबद्दल माहिती खाली दिली आहे
मराठी शाळेची माहिती:
घटक | माहिती |
---|---|
शालेय वर्ष सुरू होण्याची तारीख | 23 August 2025 |
शालेय वर्ष संपण्याची तारीख | 7 June 2026 |
शाळेची वेळ | दर रविवारी सकाळी १० ते १२ |
शाळेचे ठिकाण | Metrolina Regional Scholars’ Academy, 5225 Seventyseven Center Dr. Charlotte, NC 28217 |
वयोगट | वय वर्ष ५ ते १५ |
शालेय वेळापत्रक | Mecklenburg County च्या शाळेचे वेळापत्रक वापरले जाईल |
शाळा बंद असलेले दिवस | Long weekends, Winter Break, Spring Break |
ऑनलाइन शिक्षण पर्याय | गरज भासल्यास Zoom वर remote learning – निर्णय शाळा समितीकडून होईल |
-
विशेष सूचना:
-
Mecklenburg county च्या शाळेचे वार्षिक वेळापत्रक मराठी शाळेसाठी वापरले जाईल.
-
Long weekends, Winter Break, Spring Break दरम्यान शाळा बंद राहील.
-
गरज भासल्यास शाळा Zoom वर remote learning पद्धतीने चालवली जाईल – याचा निर्णय शाळा समिती घेईल.
-
नोंदणी व शुल्क (वार्षिक):
-
CMM सभासदांसाठी: 💵 $250
-
CMM चे सभासद नसलेल्यांसाठी: 💵 $300
कृपया लक्षात घ्या:
-
शाळेची संपूर्ण फी शालेय वर्षाच्या सुरुवातीला भरावी लागेल.
-
एकदा शाळा सुरू होऊन एक महिना झाल्यावर फी परत करता येणार नाही.
-
फी शार्लट मराठी मंडळाद्वारे स्वीकारली जाईल.
-
ही शाळा शार्लट मराठी मंडळाच्या सभासदांद्वारे चालवली जाते.
(Charlotte Marathi Mandal – Non-profit संस्था) -
शाळा समितीतील सदस्य स्वयंसेवक म्हणून काम करतात.
-
जमा झालेली रक्कम शाळेतील आवश्यक सामग्री आणि इतर खर्चासाठी वापरली जाईल.
-
नोंदणीनंतर पालकांना:
-
allergies बाबत माहिती
-
photo/video consent form
-
शाळेत आणावयाच्या वस्तू याची माहिती दिली जाईल.
-
आवश्यकता असल्यास Zoom द्वारे पालकांच्या शंका निरसन सत्राचे आयोजन होईल.
-
अधिक माहितीकरता:
🔗 बृहन् महाराष्ट्र मंडळ मराठी शाळा – अधिकृत वेबसाइट
संपर्क:
मराठी शाळा समिती
📧 marathishala@charlottemarathimandal.org
School Committee:
-
School Coordinators:
Pradnya Apte & Radhika Paramanand -
Treasurer:
Radhika Paramanand -
Social Media Coordinator:
Pradnya Apte -
Event Coordinator:
Jyotsna Maid