गणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत

गणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत

by अभिजीत शेंडे

abhijit-shende

गणपती बाप्पा मोरया!

शारलट हे शहर अमेरिकेतील नॉर्थ केरोलिना राज्यात आहे. शारलट आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी मंडळी एकत्र यावीत हा मूळ हेतू घेऊन स्थापन झाले ते “शारलट मराठी मंडळ“.

गणेशोत्सव भारतात जसा जोरात सुरु होतो तसाच भारताबाहेरपण होतो. सातासमुद्रापार असणारी शारलटची मराठी मंडळी यापासून दूर कशी राहू शकणार? अमेरिकेत तसे गुजराथी आणि दक्षिण भारतातील मंडळी भरपूर असल्याने इथल्या मंदिरांमध्ये, इंडियन ऑर्गनायझेशन्स मध्ये त्यांचाच प्रभाव / दबदबा असतो. पण शारलट मराठी मंडळांने गणेशोत्सवात पुढाकार घेऊन सर्व भाषिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास दशकापूर्वीपासून शारलट मराठी मंडळ आणि हिंदू सेंटर एकत्रित मिळून पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी एकत्र येतात, नवीन ओळखी होऊन सातासमुद्रापार मित्रपरिवार वाढतो, उत्सव पाहून आणि पुढील पिढीलाही आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची ओळख होते. सगळ्यांच्याच कलागुणांना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळते.

ह्या पाच दिवसात जवळपास सहा ते सात हजार लोक जेवणाचा आनंद घेतात. दर्शन आणि आनंद घेणारी मंडळी फक्त मराठीच नाही तर इतर पण असतात. ह्या सगळ्या महाप्रसाद तयारीसाठी असतात भरपूर मदतीचे हात…. !!!!!! येथील मंदीर आणि त्यांच्या टीम, इतर कार्यकर्ते स्वतःच्या घरच्या कामासारखे झटणारी मंडळी….! अश्या भावना पांडुरंग आणि मनीषा नाईक यांनी व्यक्त केल्यात. शारलट मध्ये आप्पा आणि गीता जोशी हि फॅमिली गेल्या ३४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करते.

गणेश स्थापनेनंतर होता “गीत मेळा” हा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यात भाग घेणारे होते छोटे उस्ताद ते मोठे अशी मस्त मेजवानीच होती. त्याचबरोबर होते अश्विनी कथक डान्स ऍकेडेमीचा शानदार कार्यक्रम. समीर पवार म्हणाले कि आपल्या शहरातील टॅलेंट आणि त्या कार्यक्रंमांन मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.

टाइमपास चित्रपटफेम केतकी माटेगावकर आणि तिची टीम सुवर्ण माटेगावकर,पराग माटेगावकर आणि विशाल गन्द्रत्वार ह्यांच्या कार्यक्रमामुळे शारलट मराठी मंडळाचा एक मानाचा तुराच रोवला गेला अशी भावना अपर्णा पाध्ये यांनी बोलून दाखवली. कार्यक्रमासाठी हॉल पूर्ण भरला होता, एवढा जास्त प्रेक्षक वर्ग आजपर्यंत कुठल्याच Charlotte मधल्या कार्यक्रमात पहिला नव्हता. सुरवातीला भजन, मग मराठी गाणे, हिंदी गाणे,नाट्यसंगीत, लावणी एकापेक्षा एक सुरेल गाण्यांची लड लागली. सुवर्णा आणि केतकी च्या गोड आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन बसले होते. लहान मोठ्यानं खिळवून ठेवणारा हा कार्यक्रम संपूच नये असे वाटते होते. एवढीशी केतकी जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे गाणे तितक्याच विविधतेने व सामर्थ्याने म्हणते तेव्हा खूप नवल वाटते. तिच्या ‘केतकी’ या अल्बम मधले पाऊस, तिचे नुकतेच आलेले संस्कृत गाणे आणि तिचे ‘वेड लागले प्रेमाचे’ एका मागे एक वन्स मोअर मिळत होते !! पण कुठेतरी थांबायला हवे होते, दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता निघायचे होते. सुवर्णाच्या ‘वंदे मातरम’ या गाण्याने कार्यक्रमाचा मस्त शेवट झाला.

गेणेशोत्सवां दरम्यान “गणेश क्रिकेट कप स्पर्धा” आयोजित केली होती त्यात जवळपास १६ टीमने भाग घेतला. आणि हा काप जिंकला तो  “Charlotte Knights” या टीमने….   आम्ही ह्या उत्सवात सगळ्यांना जवळ आणायचा प्रयत्न केला असे उत्साहितपणे दाजीबा पाटील आणि विनोद हावळ सांगत होते.

गणेश विसर्जन धडाकेबाज होण्यासाठी मंडळाचे “शिवस्य ढोल ताशा आणि लेझीम पथक” गेल्या दोन महिन्यांपासून मेहनत घेत होते. प्रमोद होले, प्रताप पाटील आणि दाजीबा पाटील हे खूप उत्साहाने सांगत होते कि पथकात जवळपास ५० महिला आणि मुले आहेत. २० ढोल, १० ताशा ७० लेझीम अशे १०० वर मोठे असलेले पथक… ह्या पथकासोबत सगळ्यांनी बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिला.

गणेस्तोस्तवाची वैशिष्ट्ये

  • पाच दिवसाचा गणपती
  • शारलट मध्ये आप्पा आणि गीता जोशी हि फॅमिली गेल्या ३४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करते.
  • सर्व भाषिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यामुळे आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची ओळख होते
  • पाच दिवसात जवळपास सहा ते सात हजार लोक जेवणाचा आनंद घेतात
  • मुलांची वक्तृत्व स्पर्धा
  • स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम
  • क्रिकेट स्पर्धा, मुलांसाठी क्रिकेट गुरु कालिचरण यांचा कॅम्प, गणेश क्रिकेट कप जिंकणाऱ्या टीम मध्ये पाकिस्तानी मूळचे बांधव
  • सुप्रसिद्ध केतकी आणि सुवर्णा माटेगावकर यांची सैगीत मैफिल
  • सुप्रसिद्ध जयवंत उत्पट यांची Percussion’s Wonder हि मैफिल
  • मंडळाच्या ढोल ताशा आणि लेझीम पथकात १०० पेक्षा जास्त लोक… महिला आणि मुलांचा अधिक सहभाग

विविधतेमुळे यंदाचा गणेशोत्सव खर्या अर्थाने नव्या स्वरूपात सादर करता आला. तेव्हा सातासमुद्रापार मराठीचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत जरूर सामील व्हा. असे आव्हान मंडळाचे ट्रस्टी संदीप पाध्ये, आनंद चक्रपाणी आणि निलिमा नाइक यांनी केले.

===============================================================================================

महाराष्ट्र टाइम्स (पुणे एडिशन): १९ सप्टेंबर २०१६

press-mata-2016-01

 

press-mata-2016-02

 

गणेशोत्सवाच्या फोटो / व्हिडीओ साठी येथे क्लीक करा.

===============================================================================================

saathee-char-oct-16-page-98-page-002

Ganesh Festival Report – English

Recently Charlotte Marathi Mandal celebrated Ganesh Festival at Hindu Center. Ganesh Festival is very close to heart of Marathi Community. Pandurang and Manisha Naik said that, during this time, community came together like a family and worked very hard to make it memorable. During five days celebration, we prepared Mahaprasad Dinner for almost 8000 people.

People did enjoy the local talent show of “Geet Mela Group” and “Ashiwni Kathak Dance Academy’s” program. We are really happy to see the more and more participants of local talent said Samir Pawar.

Marathi movie actress and well known singer Ketaki Mategaonkar and her team Suvarna Mategaonkar, Parag Mategaonkar, and Vishal Gandratwar presented their artistry which sowed a new pride in the name of Charlotte Marathi Mandal, Aparna Padhye quoted.

During Ganesh Festivals, “Ganesh Cricket-Cup league” was organized. About 16 teams had participated. It was great to see such a large participation, says Dajiba Patil and Vinod Haval.

To make Visarjana of Lord Ganesh a memorable event, “Shivasya Dhol Tasha and Lezim team” had worked so hard in last 2 months. They said that the team consisted of about 50 plus performers were present in the squad. We are showing Maharastraian Calture here says Pramod Hole, Pratap Patil and Dajiba Patil.

This event really brings all community together and we are excited to bring more and more events like this to community say Abhijit Shende, Sandeep Padhye and Anand Chakrapani.

============================================